"माझे भूतकाळ फार काही आशादायी न्हवते, तू आलीस म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आज मी ह्या यशाच्या शिखरावर पहिले पाऊल टाकले आणि तू मला सोडून निघालीस? काय करू ग मी आता? माझे हे पाऊल मागे घेऊ की आता आहे त्या स्थिती मध्ये आनंद साजरा करू की तू सोडून निघाली आहेस म्हणून कोपऱ्यात जाऊन रडत बसू? काही सुचेनासे झाले बघ."
आकाशाकडे तोंड करून, आपले दोन्ही हात फैलावून, डोळ्यातील अश्रू धावत्या नदीसारखे वाहवत तो मोठ्याने म्हणाला,
"हे ईश्वरा, आनंद आणि दुःखाच्या अगदी मधोमध उभा आहे मी, नक्की कोणत्या बाजूला पाय ठेऊ? इकडे ठेवले तर मी माझे सर्व स्वप्न पूर्ण केले असणार पण आता ती नसणार याचे दुःख पचवावे लागेल आणि तिकडे ठेवले तर ती सोबती असेल पण हातात काहीच नसेल.
करावं तरी काय आता, पण एक मात्र कर, माझ्या अंतःकरणातील दुःखाच्या बदल्यात थोडे तरी आनंद दे, देशील ना रे?"
खाली बसत डोक्याला हात लावून, भूतकाळाच्या गोष्टी आठवत, नाराजीचा सुरात तो पुटपुटला,
"आज माझी अवस्था तू जखमी मधमाश्यासारखी केलीस. माझ्या समोर आता फुलांनी गच्च भरलेली सुंदर, मनमोहक बाग आहे. सूर्य ही छान डोकावून पाहत आहे. मध सुद्धा अगदी भरपूर म्हणजे भरपूर आहे पण ते गोळा करण्याचे सामर्थ्य मात्र आज माझ्यात नाही."
ती आज काही बोलनाच, त्याचे बोलणे ती अगदी मन लावून ऐकत होती. तो मात्र डोळे बंद करून दोघांनी एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांची आठवण करत बोलत होता,
"तू इथपर्यंत माझ्यासोबत प्रवास केलास हेच खूप आहे माझ्यासाठी पण आता मला आपल्या भूतकाळात रमायचे नाहीये, कारण मला भूतकाळातील गोष्टी आठवून दुःख होते, दुःखाने माझ्या रक्ताचे एक थेंब अन् थेंब पेटते, त्याच्या रुक्षपणाने माझे हृदय तहानेने कोरडे पडते, त्याच्या तडफडण्याने माझे जीव वर-खाली होते.
तुझ्यामुळे मी इतका बोलका झालो, हसायला शिकलो, प्रेम करायला शिकलो. आता तू नसशील तर मी कोणासमोर बडबडू , कोणासमोर हसू आणि कोणावर प्रेम करू? आता माझे मला राग येत आहे. का मी इतका तुझ्यावरती विश्वास ठेवला? का मी इतका जीव तुझ्यावरती ओवाळून टाकलो? का मी इतका तुझ्या प्रेमात वेडा झालो?
बस्स, आता बास झाले!
तुझा रस्ता वेगळा नि माझा रस्ता वेगळा."
आता मात्र त्याच्या डोळ्यातील टपटपणाऱ्या प्रत्येक अश्रुंचे थेंब हे ज्वालामुखीच्या लावा रसासारखे भासत होते, अंगाला हात लावला तर क्षणात भस्म होईल इतके ते तापले होते, डोळे तर जसे एखादा साधू शाप देताना रक्तमिश्रित लालबुंद होतात तसे ते वाटत होते, जिभेला तिखट लागल्यावर जसे चटका बसून कानातून वाफ येते तसे अंगातून येणाऱ्या घामाचे रूपांतर आता वाफेत होऊ लागले होते. कडेच्या डांबाला धरत उभे राहून तिच्याकडे थरथरत्या हाताने बोट करून तो म्हणाला,
"माझी तुला इतकीच काळजी असेल तर चालती हो इथून. पुन्हा तोंड दाखवायचे धाडस सुद्धा करू नकोस."
क्रमशः

Khup Chan..👌👌waiting for next part..💓
ReplyDeleteआदित्य, खूप खूप धन्यवाद...
DeleteExcellent..👌👌Keep going..👍👍
ReplyDeleteऋतुजा, खूप खूप धन्यवाद...
DeleteEk Number Amyao...
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद संध्या...
DeleteMast ch re.... chan vatal....
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद...
DeleteMastchh Amey .... keep it up
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद...
Deleteखुप सुंदर .. खुप शुभेच्छा..
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद, श्रुतिका...
Deleteमस्तच लिहिला आहेस पण थोडा आजून दर्द भरी आजून झालं असतं जर तुझी स्वतः ची असती👍
ReplyDeleteमाझं काही नाहीच तर काय लिहू मी स्वतःबद्दल मग?
Deleteह्याचा अनुभव मला नाहीच म्हणून मी जास्त दर्दभरी लिहू शकलो नाही रे प्रथमेश...
नक्की पुढच्या भागात लिहिण्याचा प्रयत्न करेन...
खूप खूप धन्यवाद...
Mastch bhai👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद...
DeleteKhup chan amyaa....
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद, पूनम...
DeleteFantastic amyaa.....keep it up
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद...
DeleteChan...👍🤗
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद अतुल दादा...
Delete1 number Amya 👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद...
Delete